
*भारत –जपान शिव स्वराज रथयात्रा.( INDO-JAPAN SHIV SWARAJ RATHYATRA )*
स.न.वि.वी.
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की समस्त हिंदुस्थानचे आराध्यदैवत व प्रेरणास्रोत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्ती व स्मारकाचे दिनांक ८ मार्च २०२५ रोजी टोकियो (जपान) येथे अनावरण होत आहे.हा भव्यदिव्य सोहळा जपान मधील हजारो शिवप्रेमी मराठी व भारतीय बांधव यांच्या साक्षीने व अनेक उच्चपदस्थ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची उंची ही ३ मीटर व लांबी ३ मीटर असून ही अश्वारूढ मूर्ती आहे.अत्यंत सुबक,सुरेख,रेखीव आणि उत्तम दर्जा असलेल्या या मूर्तीची निर्मिती ही प्रसिद्ध शिल्पकार श्री.विवेक खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
जपानची राजधानी टोकियो मध्ये स्थापित होण्यापूर्वी या अश्वारूढ मूर्तीची भारतातील १२ राज्यांच्या प्रमुख शहरांमधून तिची रथयात्रा आयोजित केली आहे.या सर्व ठिकाणी तेथील शिवप्रेमी संघटना,राजघराण्यातील व्यतिमत्व,सामाजिक संस्था,स्थानिक सरकार यांच्यामार्फत भव्य स्वागत समारंभ पार पडणार आहे.
समस्त बेळगाववासीयांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे या शिवस्वराज रथयात्रा ही बेळगावमधून दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी मार्गक्रमण करणार आहे.
या जपानस्थित स्मारकामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळ आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने अनेक मौल्यवान पुस्तकांसह इसवी सन १६२०ते इसवी सन १८४० च्या दरम्यानची मौल्यवान पत्रे आणि पेंटिंग्जच्या खऱ्या प्रती देऊ केल्या आहेत त्या ठेवण्यात येणार आहेत जेणेकरून तेथील देशवासियांना शिवरायांच्या विचारांची देणगी सतत लाभेल.
आम्ही पुणेकर (भारत), एडोगावा इंडिया कल्चर सेंटर (EICC, जपान), ऑल जपान असोसिएशन ऑफ इंडियन्स (AJAI, Japan),शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,दुर्गवीर प्रतिष्ठान,अक्षौहिणी प्रा.ली. ,मराठा बिझनेसमेन फोरम(MBF सातारा,महाराष्ट्र) तसेच अनेक शिवप्रेमी संघटना व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्र येऊन हा कार्यक्रम नियोजित केला आहे.
या स्मारकाच्या माध्यमातून फक्त सांस्कृतिकच नव्हे तर मराठी उद्योजकतेला जागतिक स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महान कार्य देखील घडणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे ऐतिहासिक महत्व असलेल्या बेळगावनगरी मधून मार्गक्रमण होत आहे. या अभूतपूर्व शिवस्वराज रथयात्रेच्या स्वागतासाठी आपण समस्त बेळगावकर शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवावी.बहुत काय लिहिणे.अगत्य येणे करावे.
|| जय जिजाऊ,जय शिवराय ||
*दिनांक* : १८ जानेवारी २०२५
*स्थळ*: छत्रपती शिवाजी महाराज उद्यान,शहापूर, बेळगाव.
*वेळ* :सायंकाळी ५ वाजता.