
वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सकाळी 8.45 वाजता देसाई यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. छाप्यात दोन किलो डुकराचे मांस जप्त करण्यात आले. चौकशीत त्याने रानडुकराची शिकार केल्याची कबुली दिली.
त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरगढी वनविभागाचे वनसंरक्षक शिवानंद मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
वनपरिक्षेत्राधिकारी प्रशांत मंगसुळी, मेरडा परिक्षेत्राचे सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. हिरेमठ, तसेच हलगाचे वनपाल विजयकुमार कौजलगी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.संबंधित वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्ष व कडक कारवाई करून वनजीवनाचे रक्षण केले आहे.