
- होनगा येथे धर्मवीर संभाजी महाराज मूर्तीचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न
धर्मवीर संभाजी महाराजानी छ. शिवाजी महाराजासारखे सर्व जातीधर्मातीलाना सोबत घेऊन राज्य केले. आपल्या प्रिय रयतेसाठी प्राणाचे बलिदान दिले. परंतु आपले स्वराज कोणाच्याही स्वाधीन केले नाही. मराठा साम्राजाचे दुसरे छत्रपती म्हणून त्यांची आठवण अजरामर आहे. अशा या थोर धर्मवीर राजाला मानाचा मुजरा असे हात जोडून भावविवश प्रतिपादन युवा नेते राहुल जारकिहोळी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा.पं. अध्यक्षा जिजाबाई धुडूम होत्या. धर्मवीर संभाजी महाराजाच्या पुतळ्याचे लोकार्पण व दिपप्रज्वलन राहुल जारकिहोकी सह मान्यवरानी केले. पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरवात होनगा मराठा मंडक हायस्कूलच्या
मुलीनी स्वागत गीतने केले. प्रास्ताविक व स्वागत महेश आनंदाने यांनी केले. शिवमुद्राचे उद्घाटन माजी सैनिक बाबु बेळगांवकर, चौथरा उद्घाटन महेता रामभाऊ आनंदाचे, गंगा पुजन जिजाबाई धुडूम, मुर्ती अभिषेक गोपाळ शिंदोळकर यांनी केले. पुढे बोलताना राहुल जारकिहोकी म्हणाले छ- संभाजीराजे अत्यंत शूर, योध्दा होता. त्यांच्या कमी कालावधित 120 लढाया जिंकल्या. त्यांचे स्मरण ठेऊन गांवचा विकास करण्यासाठी लोकोपयोगी मंत्री सतीश जारकीहोळीच्या मदतीने गांवच्या विकासाला नवी दिशा देऊया असे आवाहन केले. मराठा मंडळ हायस्कूलचे मुख्याध्यापक गिंडे याचे समयोचित भाषण झाले.
यावेळी रामसेना तालुका अध्यक्ष भरत दादा पाटील, उद्योजक श्रीकांत कदम, महेश हलगेकर, गोपाळ शिदोळकर , दशरथ नौखडकर, माजी सैनिक सिदाप्या हुंदरे, शिवस्मारकाचे खजिनदार महेश आंनदाचे ,भाजी ग्रा.पं. अध्यक्ष पुंडलीक पाटील, विजय होनमणी, जयवंत सांबरेकर, प्रदीप सांबरेकर, बसवराज’ वाजत्री, बसाप्पा नाईक, बी.एस. नाईक, शांताराम नौखडकर, विठ्ठल आनंदाचे, कल्लापा पाटील, संजय शिंदोळकर ,भैरू परसूचे, नजीर शेख, मूर्तिकार बाबू व जिलू शेडू इतर मान्यवराचा शाल, स्मृतिचिन्ह गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आभार प्रदर्शन पुंडलीक पाटील यांनी केले.