*येळळूर गावच्या समस्यावर समाज सारथी संघटनेचा निवेदनाद्वारे प्रकाश*.
*ग्रामपंचायत पीडीओ ना दिले निवेदन*.
येळळूर, ता २१ :
पावसाळ्यापूर्वी गावातील गटारांची स्वच्छता , स्मशानभूमी मध्ये सुधारणा,आरवाळी धरण ते येळळूर शिवारातील नाला सफाई आणि गावच्या विविध उपनगरातील गटारांची स्वच्छता व डास निर्मूलन फवारणी करून लोकाना दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन समाज सारथी सेवा संघ येळळूर यांच्या वतीने येळळूर ग्रामपंचायतीच्या पी डी ओ पुनम गडगे याना नुकतेच देण्यात आले . सिध्देश्वर गल्ली बरोबर गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी गेली पाच ते सात वर्षे झाली एकदाही स्वच्छता केल्या नसल्याने गटारी मुजून अनेक ठीकाणी पावसाळ्यात सांडपाणी रस्त्यावर येते त्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकाना जीव नकोसा होतो तर गावातील सांडपाणी वाहून नेण्याच्या उपनगतातील गटारी ही गवत आणि झुडपानी बंद झाल्यामुळे सांडपाणी शेतीमध्ये पसरून शेतीची नुकसान होते आहे या गटारी साफ करून सांड पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी पावसापूर्वी यांची सफाई करावी असे निवेदनात म्हटले आहे .
येळळूर गावात मुख्य स्मशान भुमीसह विविध समाजाच्य दोन ते तीन स्मशान भूमी असून गावाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे स्मशानातील शेगड्यांची संख्या अपुरी पडत असल्याने तेथील शेगड्यांची संख्या वाढवावी व शेडची दुरुस्ती करावी तर पुख्य स्मशान भूमीत नव्याने शेड उभारत जादा दोन ते तीन शेरड्यांची सोय करावी अशी मागणी ही करण्यात आली आहे
गावात जे जे एम ची स्कीम द्वारे पाणी पुरवठा केला जातो पण पाणी पुरवठ्याच्या बाबतीत स्कीम कूच कमी ठरली असून ती सुरळीत करण्याची ही निवेदनात मागणी केली आहे गावात अजुनही बऱ्याच ठीकाणी पिण्याच्या पाण्याचा अपुरा पाणी पुरवठा होत असून तो ही सुरळीत करावा . लक्ष्मी तलावावर लावलेल्या झाडांच्या फांद्या अती वाढीमूळे छ. शिवाजी रोडवर राहत्या घरापर्यंत लोबकळत आल्याअसून त्याखालुन विजेच्या तारा गेल्या आहेत वादळी वारा आणि अती पावसामुळे त्या मोडून वीजेच्या तारा आणि घरावर पडण्यापूर्वी के ई बी व फॉरेष्ट खात्याशी संपर्क करून त्या हटवण्याची मागणी ही करण्यात आली आहे .
पावसाळ्यापूर्वी नाले व गटारी सफाई करून उपनगरात डासांच्या निर्मूलना साठी लवकरच काम सुरु होणार असून उपनगतातील गटारांची सफाई करून सांडपाणी नाल्यात सोडण्यासाठी कामाची सुरवात दोन दिवसात होणार असल्याचे पी डीओ पुनम गडगे यानी यावेळी सांगीतले तर जे जे एम स्कीम मध्ये असणाऱ्या
त्रुटीबाबत पाणी पुरवठा विभागाला आणि जिल्हा परिषेदेला पत्र दिले असल्याचे सांगीतले . ही स्कीम अजून ग्रामपंचायतीन ताब्यात घेतली नसल्याचे सांगितले. तर लवकरात लवकर लक्ष्मी चौकाच्या कंपाउंड चे कामही सुरू होईल असे त्यानी सांगीतले . यावेळी समाज सारथी सेवा संघाचे अध्यक्ष सी एम गोरल, उपाध्यक्ष दुदाप्पा बागेवाडी , शिवाजी सायनेकर हणमंत पाटील ‘ डॉ. पावले ‘ सुरज गोरल ‘ हणमंत कुगजी ‘ राजु पावले ‘ गोविंद काळसेकर परशराम बिजगरकर ‘ यलुप्पा पाटील अनिल हुंदरे प्रकाश अष्टेकर दता उघाडे ‘ कृष्णा बिजगरकर बी एन मजूकर, सुभाष मजुकर रमेश धामणेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
