बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर येथे २०१४ साली घडलेल्या ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक प्रकरणातील सर्व सात खटल्यांचा शेवट अखेर झाला असून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल दहा वर्षे चाललेल्या या कायदेशीर लढाईत ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
२७ जुलै २०१४ रोजी फलक हटविल्यानंतर पोलिसांनी सात गुन्हे दाखल केले होते. यापूर्वी पाच खटल्यांमध्ये आरोपी निर्दोष सुटले होते, तर उर्वरित दोन खटल्यांचाही निकाल आता ग्रामस्थांच्या बाजूने लागला आहे.
या प्रकरणात अनेक निरपराध ग्रामस्थांना कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. पोलिसांच्या कारवाईनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र न्यायालयाच्या निकालामुळे सर्व आरोपी निर्दोष ठरले असून, मराठी भाषिकांच्या एकजुटीचा विजय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
या दीर्घ लढ्यात काही जणांचे निधन झाले, तर काही आरोपींची नावे अनुपस्थितीमुळे वगळण्यात आली. या प्रकरणात वकिलांनी सातत्याने पाठपुरावा करून न्याय मिळवून दिला.

‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; 10 वर्षांची लढाई संपली
Related Posts
बेळगाव साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी संजय गुरव*
Spread the love*स्वागताध्यक्ष संजय गुरव : कृतीशील नेतृत्वाचा सन्मान* *बेळगाव साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी संजय गुरव* *बेळगाव, दि. २३ :* ७ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या _स्वागताध्यक्षपदी_ कुद्रेमनी येथील…
जयंत पाटील यांना ७व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण*
Spread the love*जयंत पाटील यांना ७व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण* *माय मराठीचा जागर हीच खरी सांस्कृतिक सेवा” ; जयंत पाटील यांचे गौरवोद्गार* बेळगाव ( प्रतिनिधी ) दि…
