बेळगाव तालुक्यातील निलजी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचा शतक महोत्सव १२ व १३ एप्रिल २०२६ रोजी दोन दिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. १९२६ साली स्थापन झालेल्या या शाळेने शंभर वर्षांचा गौरवशाली टप्पा पूर्ण केल्याने संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण आहे.
रविवार, १२ एप्रिल रोजी सकाळी ७:३० वाजता प्रबोधन दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम व दानशूर देणगीदारांचा सत्कार होईल. तसेच निवृत्त शिक्षकांचा गौरव व स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले आहे.
सोमवार, १३ एप्रिल रोजी उद्घाटन समारंभ पार पडणार असून, या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावरील वक्ते राहुल गिरी उपस्थित राहून ‘युवा प्रेरणा’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळ्यास पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खासदार जगदीश शेट्टर, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, राज्यसभा सदस्य ईराण्णा कडाडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ‘भूपाळी ते भैरवी’ या विशेष कार्यक्रमातून मराठी लोककलेचा रांगडा आविष्कार सादर केला जाणार आहे. शाळा शतक महोत्सव समितीचे अध्यक्ष रामचंद्र मोदगेकर व कार्याध्यक्ष ॲड. लक्ष्मण पाटील यांच्या नेतृत्वाखाली महोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.
निलजी मराठी शाळेचा शतक महोत्सव १२-१३ एप्रिलला; दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी
Related Posts
शाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी
Spread the loveशाहापूरात शिवकालीन युद्धकलेचा थरार; शिवसंस्कृतीचा जाज्वल्य वारसा अनुभवण्याची संधी न्यूज: बेळगावातील शाहापूर परिसरात शिवसंस्कृतीचा गौरवशाली वारसा जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने शिवकालीन युद्धकलेचा भव्य आणि थरारक कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार
Spread the loveयेळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार येळ्ळूर दि. 17- येळ्ळूरमधील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्यानंतर संपूर्ण सीमाभागात संतापाची लाट उसळली. मराठी भाषीकांच्या हृदयावर घाव घालून…
