
- गर्लगुंजीची रोहिणी पाटील राज्यस्तरीय ज्यूडो स्पर्धेत सुवर्णपदक विजेती; खानापूर तालुक्याचा अभिमान
गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ज्यूडो खेळाडू रोहिणी पुढलिक पाटील हिने बेळगावच्या गांधीभवन येथे प्रथमच झालेल्या कर्नाटक राज्यस्तरीय ओपन ज्यूडो चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी करत ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
रोहिणी पाटील हिने प्राथमिक शिक्षण गर्लगुंजी सरकारी प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण माऊली गर्ल्स हायस्कूलमध्ये पूर्ण केले असून सध्या ती बेळगाव येथे कॉलेज शिक्षण घेत आहे. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेली रोहिणी गर्लगुंजी गावातील ज्यूडो खेळात सुवर्णपदक मिळवणारी पहिलीच खेळाडू ठरली आहे.
- तिच्या या यशाबद्दल खानापूर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून खानापूर लायन्स क्लबच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला.