
बेळगाव : गुरुवार पेठ टिळकवाडी येथील रहिवासी कॉ. सौ. कला नागेश सातेरी (वय 72) यांचे अल्पशा आजाराने आज मंगळवार दि. 22 रोजी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती माजी महापौर ऍड. नागेश सातेरी, मुलगा ऍड. अजय सातेरी, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. जायंट्स आय फौडेशनच्या माध्यमातून त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात येणार आहे.
कॉ. कला सातेरी या भारतीय महिला फेडरेशनच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या त्या माजी अध्यक्षा, राज्य शाखेच्या अध्यक्षा, व राष्ट्रीय मंडळाच्या सदस्या, अन्नपूर्णा महिला मंडळ बेळगाव अध्यक्षा तसेच बेळगाव मधील विविध संघ संस्थांशी त्यांचे जवळचे संबंध होते.
त्यांच्या निवासस्थानी 4 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.