बेळगाव येथे कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून दरवर्षी बेळगावात मराठी भाषिकांच्या वतीने समितीच्या नेतृत्वाखाली महामेळाव्याच्या आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षी ही सोमवार दि. 9 रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव येथे महामंडळाचे आयोजन करण्यात आले आहे. सीमा भागातील लोकांनी मोठ्या प्रमाणात बेळगाव येथील महामेळाव्याला उपस्थित राहावे म्हणून सर्वत्र महामेळाव्याची जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे गुरूवार दि.4 रोजी आठवडी बाजाराच्या निमित्ताने जांबोटी पेठ आणि गावात महामेळाव्याच्या जनजागृती बाबतची पत्रके वाटून महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन म.ए समितीचे नेते व पदाधिकाऱ्यांनी केले.यावेळी लोकांनी मोठ्या प्रमाणात महा मेळाव्याला उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त केला. मेळाव्याचे ठिकाण ऐनवेळी जाहीर करण्यात येणार आहे.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई माझी तालुका पंचायत सभापती मारुतीराव परमेकर रवींद्र शिंदे राजू चिखलकर कृष्णा देसाई मोहन देसाई राजाराम देसाई रवींद्र देसाई शंकर अजून एकर अरुण देसाई विठ्ठल राजगड पंडित नवलकर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष गोपाळराव देसाईसरचिटणीस आबासाहेब दळवी गोपाळ पाटील राजाराम देसाई विनोद राठोड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
जांबोटी पेठ आणि गावात महामेळाव्याच्या जनजागृती बाबतची पत्रके वाटून महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन म.ए समितीचे नेते व पदाधिकाऱ्यांनी केले.
Related Posts
नंदगड महालक्ष्मी यात्रेमध्ये भाविकांनी आहेर आणू नये: यात्रा कमिटी आव्हान
Spread the loveनंदगड महालक्ष्मी यात्रेमध्ये भाविकांनी आहेर आणू नये: यात्रा कमिटी खानापूर: तालुक्यातील नंदगड येथे 24 वर्षांनंतर महालक्ष्मीची यात्रा आयोजित करण्यात आली आहे. गावातील पंच मंडळी आणि यात्रा कमिटीच्या नेतृत्वाखाली…
युवा मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहा चलवेनट्टी भागात जागृती सभा*
Spread the love*युवा मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहा चलवेनट्टी भागात जागृती सभा* तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व तालुका आघाडीतर्फे येत्या 12 जानेवारी रोजी जागतिक युवा दीना निमित्त युवा मेळावा आयोजित केलेला…