Spread the love

बेळगाव : येथील पायोनियर अर्बन सहकारी बँकेला सलग तिसऱ्या वर्षी उत्कृष्ट बँक हा पुरस्कार बहाल करण्यात आला. बेळगाव जिल्हा अर्बन सहकारी बँक असोसिएशन ची वार्षिक सर्वसाधारण सभामंगळवारी मराठा बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली. त्याप्रसंगी बेळगाव जिल्ह्यातील 28 बँकापैकी पाच बँकांना वेगवेगळ्या कॅटेगिरी मध्ये उत्कृष्ट बँकेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

101 ते 200 कोटी ठेवी असणाऱ्या बँकांमध्ये पायोनियर बँकेने गेल्या काही वर्षात उल्लेखनीय प्रगती केली असल्याने सलग तिसऱ्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आला. पायोनियर बँकेचे विद्यमान चेअरमन श्री प्रदीप अष्टेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह आणि फळाची करंडी भेट देऊन श्री अष्टेकर यांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी बँकेचे संचालक सर्वश्री रणजीत चव्हाण पाटील, अनंत लाड, शिवराज पाटील, सुहास तराळ, गजानन ठोकणेकर, श्रीमती अरुणा सुहास काकतकर आणि सीईओ अनिता मूल्या व व्यवस्थापक डी आर जाधव आदि उपस्थित होते. प्रदीप अष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली बँकेने गेल्या काही वर्षात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल हा सन्मान करण्यात आला.