*महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने ४ जानेवारी २०२५ रोजी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन.*
प्रतिवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती,बेळगाव आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२५ सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन करण्यासोबतच विद्यार्थ्यांचे बुद्धिवर्धक होऊन भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षेला धैर्याने सामोरे जाण्यासाठी आयोजित करत आहोत.
ही स्पर्धा येत्या ५ जानेवारी २०२५ रोजी मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे संपन्न होणार आहे.
ही स्पर्धा सीमाभाग मर्यादित असून यावर्षी चार गटात होणार आहे.
१) प्राथमिक विभाग (लहान गट) इयत्ता ४ थी पर्यंत,
२) प्राथमिक विभाग (मोठा गट) इयत्ता ५ वी ते ७ वी
३) माध्यमिक विभाग ८ वी ते १० वी पर्यंत
४) महाविद्यालयीन विभाग (सीमाभाग व्यतिरिक्त आंतरराज्यीय विद्यार्थी सहभागी होऊ शकतात) इयत्ता ११ वी ते पदव्युत्तर( वयवर्षे २६ पर्यंत)
सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता, शिवकालीन इतिहास, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व सीमाप्रश्न या विषयावर आधारित सदर स्पर्धा होणार आहे.
विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे तर सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागी झालेबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
नावनोंदणीची अंतिम तारीख १/१/२०२५ असून स्पर्धकांनी नावनोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे स्पर्धा प्रमुख
सिद्धार्थ चौगुले 7338097882
इंद्रजित धामणेकर
9886484332
प्रतीक पाटील 7338145673
आशिष कोचेरी 9886103373
यांच्याशी तर अधिक माहितीसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कार्यालय, कावळे संकुल, टिळकवाडी बेळगाव येथे संपर्क साधावा.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने ४ जानेवारी २०२५ रोजी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन.*
Related Posts
बेळगाव शहरातील अनगोळ सह हारुगेरी, बेल्लद बागेवाडी या ठिकाणी या धाडी एकाच वेळी धाडी*
Spread the loveचार दिवसापूर्वी आयकर खात्याने बेळगावात उद्योजक आणि व्यावसायिकांवर धाडसत्र राबविले होते. आता लोकायुक्त अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा बेळगावमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. बेकायदेशीर मालमत्ता संपादनाच्या तक्रारीवरून…
प्रयागराज मध्ये झालेल्या दुर्घटनेतील मृतदेहांना आज दुपारी पर्यंत मृतदेह बेळगावला आणण्यासाठी प्रयत्न*बेळगावला आणण्यासाठी विशेष टीमची नियुक्ती
Spread the love*आज दुपारी पर्यंत मृतदेह बेळगावला आणण्यासाठी प्रयत्न* बेळगाव प्रयागराज मध्ये झालेल्या दुर्घटनेतील मृतदेहांना बेळगावला आणण्यासाठी विशेष टीमची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना प्रयागराजला रवाना करण्यात आले आहे. आज…