Spread the love

*युवा मेळाव्याला पिरनवाडी भागातून बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार*-–नारायण
मुचंडीकर*

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी म्हणजेच 12 जानेवारी हा युवा दिन म्हणून साजरा केला जातो, याचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व तालुका युवा आघाडी यांनी रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी *युवा मेळावा* आयोजित केला आहे,

 

हा मेळावा १२ जानेवारी रोजी मराठा सांस्कृतिक भवन शहापूर महात्मा फुले रोड येथे होणार असून या मेळाव्याला खासदार अमोल कोल्हे व आमदार रोहित यांची उपस्थित राहून युवकांना संबोधित करणार आहेत.

यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांनी पिरनवाडी येथील श्रीराम मंदिरात जागृती सभा घेतली व युवा मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहून सीमालढ्याला बळकटी देऊन मेळावा यशस्वी करावा असे आवाहन अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी केले.

पिरनवाडी भागातून बहुसंख्येने उपस्थित राहणार असल्याची ग्वाही नारायण मुचंडिकर यांनी दिली.
यावेळी युवा समिती सीमाभागचे सरचिटणीस मनोहर हुंदरे,उपाध्यक्ष प्रवीण रेडेकर,
जोतिबा येळ्ळूरकर,प्रकाश मुचंडिकर,संदीप उडघटगी,मंथन मुचंडिकर,विनायक मुचंडिकर,विनायक उचगावकर,कुबेर मुचंडिकर,दिनेश मुचंडिकर,राहुल राठोड,मनोहर बिंदले,नागराज पेडणेकर,ओमकार आपटेकर,गणेश आपटेकर आदी उपस्थित होते.