बेळगाव : केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेले खत योग्य पद्धतीने न वाटल्याचा आरोप माजी आमदार व भाजप रयत मोर्चा प्रदेशाध्यक्ष ए. एस. पाटील नडहळळी यांनी राज्य सरकारवर केला. बेळगाव येथे बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी काँग्रेस सरकारवर शेतकरी विरोधी कारभाराचा आरोप केला.
त्यांनी सांगितले की, येडियुरप्पा यांच्या कार्यकाळात शेतकरी केंद्रस्थानी ठेवून योजना राबवण्यात आल्या. मात्र काँग्रेस सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणारी ४,००० रुपयांची मदत कमी करण्यात आली, पाणीपुरवठा योजना बंद केली तसेच यंत्रसामग्री व डिझेल अनुदानही थांबवण्यात आले.
विद्यानिधी योजनेचा लाभ २३ लाख शेतकरी कुटुंबांना झाला असता, पण तीही बंद करण्यात आली. सिरीधान्यासाठी प्रति हेक्टर १० हजार देण्याची योजना देखील थांबवली गेल्याचे त्यांनी सांगितले. फसल विमा व केंद्राकडून मिळालेल्या ३४५४ कोटी रुपयांच्या भरपाईतही शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही, असा आरोप त्यांनी केला.
राज्यात ३४०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून बनावट बियाणे व खत कंपन्यांविरुद्ध योग्य कारवाई न झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृषीमंत्री चालुरयस्वामी यांनी खताचा साठा तपासावा आणि प्रत्यक्ष स्थिती स्पष्ट करावी, असे आव्हान नडहळळी यांनी दिले.
या पत्रकार परिषदेत भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, शहरी अध्यक्षा गीता सुतार, माजी आमदार संजय पाटील व महांतेश दोडगौडा उपस्थित होते.—
विद्यानिधी योजनेचा लाभ २३ लाख शेतकरी कुटुंबांना झाला असता, पण तीही बंद करण्यात आली. सिरीधान्यासाठी प्रति हेक्टर १० हजार देण्याची योजना देखील थांबवली गेल्याचे त्यांनी सांगितले. फसल विमा व केंद्राकडून मिळालेल्या ३४५४ कोटी रुपयांच्या भरपाईतही शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही, असा आरोप त्यांनी केला.
राज्यात ३४०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून बनावट बियाणे व खत कंपन्यांविरुद्ध योग्य कारवाई न झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृषीमंत्री चालुरयस्वामी यांनी खताचा साठा तपासावा आणि प्रत्यक्ष स्थिती स्पष्ट करावी, असे आव्हान नडहळळी यांनी दिले.
या पत्रकार परिषदेत भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, शहरी अध्यक्षा गीता सुतार, माजी आमदार संजय पाटील व महांतेश दोडगौडा उपस्थित होते.