Spread the love

लायन्स क्लबच्या सदस्यांचा वनमहोत्सव व व्यसनमुक्ती दिन साजरा
रुमेवाडी येथील शासकीय मराठी उच्च प्राथमिक शाळेत वनमहोत्सव दिन आणि व्यसनमुक्ती दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात लायन्स क्लबच्या विविध सदस्यांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमात लायन राजू पी. आनंदाचे यांनी शाळेसाठी अ‍ॅक्वागार्ड वॉटर प्युरिफायर देणगी जाहीर केली. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन आणि अंमलबजावणी लायन एम. जी. कुमार, लायन प्रकाश बेटगौडा, लायन महेश पाटील, लायन जुनेद टोपीनकट्टी, सचिव लायन विनय हिरेमठ आणि अध्यक्ष लायन विकास कल्याणी यांच्या सहकार्याने यशस्वी झाले.

लायन अजित पाटील यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला.
कार्यक्रमाचे समन्वयक लायन बसवराज हम्मननवर यांनी सर्व लायन सदस्यांचे मन:पूर्वक आभार मानले.