
वीर सावरकर चषकावर बेळगावच्या आबा हिंद क्लबचा कब्जा; जलतरणपटूंची 91 पदकांसह ऐतिहासिक कामगिरी
इचलकरंजी येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र व कोल्हापूर ॲमेचर असोसिएशन यांच्या सानिध्याखाली, सावली सोशल सर्कल आयोजित आंतरराज्य जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद क्लबच्या जलतरणपटूंनी शानदार कामगिरी करत 48 सुवर्ण, 20 रौप्य व 23 कांस्य असे एकूण 91 पदके जिंकत वीर सावरकर चषक पटकावला.
- कुमार तनुज सिंग (ग्रुप 2) पाच सुवर्ण, कुमारी तन्वी बर्डे (ग्रुप 1) पाच सुवर्ण आणि कुमारी निधी मुचंडी (ग्रुप 5) सहा सुवर्ण व एक रौप्य पदक मिळवत वैयक्तिक चॅम्पियनशिपचा मान पटकावला. इतर जलतरणपटूंनीही उल्लेखनीय यश मिळवले.
ही ऐतिहासिक कामगिरी जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, रणजीत पाटील, सतीश धनुचे, संदीप मोहिते आणि संपूर्ण प्रशिक्षक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली साध्य झाली. क्लब अध्यक्ष शितल हुलबत्ते, अरविंद संगोळी, राजू मुंदडा, शुभांगी मंगळूरकर आणि भरत गडकरी यांचे प्रोत्साहनही महत्त्वाचे ठरले.