
हॉली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल बीडी (खानापूर) चे कराटे स्पर्धेत उज्वल यश
लक्ष्मेश्वर, गडग जिल्हा (कर्नाटक) येथे पार पडलेल्या 9व्या आमंत्रित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बीडी (खानापूर) येथील हॉली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांवर आपली मोहोर उमटवली.
या स्पर्धेत विविध वजनी गटात विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली असून, त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच शाळेच्या व्यवस्थापन, मुख्याध्यापिका सिस्टर संगीता अमेंदा, उपमुख्याध्यापिका सिस्टर पॅट्रिशिया क्रास्टा, श्री. डॉमिनिक नाझरेथ यांना जाते.
कराटे प्रशिक्षक जितेन्द्र काकतिकर यांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन दिले. शाळेच्या वतीने सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.