बेकायदेशीररित्या हुबळी येथे नेण्यात येत असलेली तब्बल 2 कोटी 73 लाख 27 हजार 500 रुपयांची रोकड जप्त,
:बेळगाव प्रति… महाराष्ट्रातील सांगली येथून अशोक लेलँड दोस्त या मालवाहू वाहनाच्या केबिनमध्ये दडवून बेकायदेशीररित्या हुबळी येथे नेण्यात येत असलेली तब्बल 2 कोटी 73 लाख 27 हजार 500 रुपयांची रोकड बेळगाव शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (सीसीबी) जप्त केल्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
सचिन मेनकुदळे (रा. सांगली, महाराष्ट्र) आणि मारुती मारगुडे (रा. सांगली, महाराष्ट्र) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघाजणांची नावे आहेत. बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग आणि दोन्ही पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदिश्वर कुंबार आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे काल शुक्रवारी सायंकाळी सांगली येथून हुबळीकडे निघालेला एक अशोक लेलँड दोस्त हे मालवाहू वाहन अडविले.
त्यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्याच्या केबिनमध्ये बनवण्यात आलेल्या चोर कप्प्यात 2 कोटी 73 लाख 27 हजार 500 रुपयांची रोख रक्कम सापडली.
बेकायदेशीररित्या हुबळी येथे नेण्यात येत असलेली तब्बल 2 कोटी 73 लाख 27 हजार 500 रुपयांची रोकड जप्त,
Related Posts
पुणे खडकवासला मतदार संघाचे भाजपचे आमदार श्री भीमराव आण्णा तपकीर यांना सीमाप्रश्नी निवेदन*
Spread the loveपुणे खडकवासला मतदार संघाचे भाजपचे आमदार श्री भीमराव आण्णा तपकीर यांना सीमाप्रश्नी निवेदन* खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे निवेदन…! पुणे येथील खानापूर व बेळगाव मित्रमंडळ आयोजित उद्योजक मेळाव्यात…
जी एस एस पी यु काॅलेज मध्ये विविध स्पर्धांचा परितोषक वितरण सोहळा काॅलेज महिला संघटनेच्या वतीने.
Spread the loveजी एस एस पी यु काॅलेज मध्ये विविध स्पर्धांचा परितोषक वितरण सोहळा काॅलेज महिला संघटनेच्या वतीने. संस्कृतीक,नैपुण्य, इलेक्ट्रोल लिटरसी या संघाद्वारे विद्यार्थी वर्गासाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले,संस्कृतीक संघाद्वारे…