Spread the love

*बेळगावमधे होणाऱ्या कर्नाटक हिवाळी अधिवेशनात सुवर्णसौधसमोर शेतकऱ्यांचे धरणे* कर्नाटकात विरोधी पक्षात बसलेल्या काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकीआधी आंम्ही सत्तेवर आल्यास मागील भाजपा सरकारने पारित केलेले तीन क्रूषी कायदे मागे घेत शेतकऱ्यांना स्थैर्य व इतर सर्व समस्याचे तात्काळ निवारण करण्यात येईल म्हणून ठोस आश्वासन दिल्याने कर्नाटकातील शेतकऱ्यांनी काँग्रेसला सत्तेवर बसवले.पण आजपर्यंत कोणतेच आश्वासन पूर्ण न केल्याने गाजराची पुंगी दाखवल्याने शेतकरी बंडाची तयारी करत आहे.त्यासाठी बेळगावमधे कर्नाटक राज्य रयत संघटना-हरितसेना अध्यक्ष कोडिहळ्ळी चंद्रशेखर यांनी कन्नड साहित्य भवन येथील पत्रकारासमोर ते मारक ठरणारे तीन क्रूषीकायदे त्वरित मागे घ्यावे,ओला दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी,शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी,विद्यूत खात्याचे खासगीकरण थांबवत त्यांच्या शेतापर्यंत विज द्यावी,अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सुपीक जमीनीतून बेकायदेशीर करत असलेला हालगा-मच्छे बायपास रद्द करावा,ऊसाला योग्य भाव द्यावा यासह इतर समस्या मुक्त करावे.न केल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात सुवर्णसौधसमोर धरणे धरणार असा सज्जड ईशारा दिला.