Spread the love

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अपक्ष उमेदवार शिवाजीभाऊ पाटील यांना जाहीर पाठिंबा. शिवाजीराव! तुम्ही रामाची भूमिका बजावा आम्ही हनुमानाची भूमिका निभावू. येणाऱ्या 20 नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे विजयी करू असा आत्मविश्वास कोल्हापूर जिल्हा मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला. चंदगड तालुक्याच्या इनाम सावर्डे येथील भव्य मेळाव्यात त्यांनी हे आपले मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष कामगार सेना विवेक पाटील. सचिव तुकाराम पाटील, आजरा तालुकाध्यक्ष आनंदा घंटे, गडहिंग्लज तालुका महिला अध्यक्ष शितल पाटील, गडहिंग्लज शहर अध्यक्ष केंप्पांना कोरी, शहर अध्यक्षा रीमा चव्हाण , गडहिंग्लज मनसे विद्यार्थी सेनाचे प्रभात साबळे, तसेच अध्यक्षस्थानी माजी आमदार व रोहयोचे माजी राज्यमंत्री भरमु अण्णा पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना नागेश चौगुले पुढे म्हणाले की, या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. तेव्हा भेदभाव वगैरे सोडून देऊन शिवाजीरावांचे हात बळकट करण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजीराव भाऊ हे काही लपून छपून बसणारे नसून बिनधास्त निवडून येणार असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला. भाऊंचे काम हे फार आश्चर्यकारक व मोठे असून तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे चौगुले यांनी म्हणाले. आपण या निवडणुकीच्याद्वारे शिवाजीरावांना निश्चित विजयी करू असा एकच निर्धार व्यक्त करणे ही काळाची गरज असेही त्यांनी सांगितले. जनमानस एक झाले तर शिवाजी भाऊंचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. शिवाजी दादाना जर सर्व बाजूंनी पाठिंबा मिळाला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसेचा निश्चित पाठिंबा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्यात आजरा गडहिंग्लज व चंदगड हा संपूर्ण भाग अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो मात्र माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मी स्वतः विविध विकास कामे राबवून गोरगरीब जनतेचे कामे केली असल्याचे शिवाजीराव पाटील यांनी आपल्या भाषणात हा भाग विकसित मतदार संघ होणार असल्याचे ठामपणे त्याने सांगितले महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा शाखेने जो मला जाहीर पाठिंबा व्यक्त केला त्याबद्दल मी या सर्वांचा ऋणी असल्याचे सांगून येणाऱ्या काळात मी मनसेचे सर्व कामे पूर्ण करण्यास सदैव सिद्ध असल्याचे यावेळी सांगितले .