Spread the love

*राज्य रँकिंग रोलर स्केटिंग मध्ये बेळगाव ची जानवी तेंडुलकर प्रथम*

बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन ची स्केटर्स जानवी तेंडुलकर हिने २०२४ मध्ये झालेल्या सर्व राज्य रँकिंग रोलर स्केटिंग स्पर्धे मध्ये चमकदार कामगिरी केले बद्दल तीचा कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला हा सत्कार कर्नाटक राज्य रोलर स्केटिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी श्री इंदुधर सीताराम यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची कर्नाटक राज्य रांकिग ट्रॉफी देवून गौरविण्यात आले हा कार्यक्रम म्हैसूर येथे पार पडला यावेळी तिचे आई वडील तिचे प्रशिक्षक व इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.जानवी ही महिला विद्यालय इंग्लीश मिडीयम स्कूल ची विद्यार्थी असून स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर, विठल गंगने,योगेश कुलकर्णी,विशाल वेसने यांच्या मार्गदर्शना खालील सराव करत असते.