बेळगाव :
सालाबाद प्रमाणे यावर्षीही मुतगा गावाची श्री भावकेश्वरी यात्रा शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडावी यासाठी म्हणून पूर्वभावी शांतता कमिटीची बैठक मुतगा ग्रामपंचायत मध्ये पार पडली, शुक्रवार दिनांक 27 व शनिवार दिनांक 28 रोजी होणाऱ्या या यात्रेला पर गावचे पै पाहुणे सह हजारो भाविक यात्रेला येतात , येणाऱ्या सर्व भाविकांनी आपली चार चाकी वाहने गावच्या वेशीतील असलेल्या शाळेच्या पटांगणात व खुल्या जागेमध्ये गाडी पार्किंग करावी आणि यात्रेचा मुख्य रस्त्यावर गर्दी करू नये याची भाविकांनी नोंद घ्यावी असे भाविकांना सुचित करण्यात आले आहे , दोन दिवसीय यात्रा काळात कोणत्याच प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून मारीहाळ पोलीस विभागाकडून दक्षता घेतली जाणार आहे, येणाऱ्या सर्व भाविकांनी सहकार्य करावे असे पीएसआय मंजुनाथ यांनी आव्हान केले आहे. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष किरण पाटील ,भालचंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य पिंटू मल्लवगोळ, पीएसआय मंजुनाथ सर, माजी तालुका पंचायत सदस्य शामराव पाटील, देवस्थान कमिटीचे सदस्य हेमंत पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण कणबरकर, राजू कणबरकर , परशराम पाटील , बाळू बिरादार, भैरू पाटील, सचिन पाटील, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष शिवाजी कणबरकर, पोलीस आणि गावकरी उपस्थित होते