Spread the love

बेळगाव :

काँग्रेसच्या मंत्री श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजपचे उमेदवार श्री जगदीश शेट्टर यांच्यावर टीका करताना तुमचा स्थानिक पत्ता सांगा? भाजप मध्ये पक्षासाठी कार्य केलेला कार्यकर्ता मिळाला नाही काय? मंगला अंगडींच्या घरामध्येच सर्व पाहिजेत काय? अश्या प्रकारच्या टीका त्यांनी केल्या आहेत, त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री धनंजय जाधव यांनी तुम्ही तर कुठे स्थानिक आहात? कॅनरा लोकसभा क्षेत्रामध्ये तुमचं गाव आहे, तुम्ही पण बाहेरचे आहात. कांग्रेस मध्ये चांगले कार्यकर्ते असताना सगळी पद तुमच्या घरातच पाहिजे आहेत का? असा प्रश्न उपस्थित करून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे