बेळगाव :
माधुरी जाधव फाउंडेशन यांच्या माध्यमातून अपंग मुलीला सायकलचे वितरण. आनंदवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या किशोरी पवार यांची 9 वर्षीय कन्या सिद्धी पवार ही मुलगी इयत्ता तिसरी वर्गात शिकत असून जन्मल्यापासून ती अपंग आहे. तिला चालता येत नाही. किशोरी या आपल्या मुलीला शाळेला रोज कडेवर घेऊन ने आन करत होत्या. हे दृश्य माधुरी जाधव यांच्या निदर्शनास आले. माधुरी जाधव यांनी किशोरीला विचारपूस केली असता त्यांना माहित झाले की तिला सायकलची गरज आहे. ही गोष्ट माधुरी जाधव यांनी बी के कंग्राळी येथील संतोष कडोलकर यांना सांगितली. संतोष यांनी क्षणाचाही विलंब न करता दुसऱ्या दिवशी सिद्धीला सायकलीचे वितरण केले. ही केलेली मदत पाहून सिद्धी ची आई किशोरी यांना आनंदाश्रू आले. यांनी संतोष कडोलकर आणि माधुरी जाधव यांचे आभार मानले. यावेळी परशराम मासेकर, अरुण शेलार ,वासंती पाटील हे उपस्थित होते.