बेळगाव :
ग्रा. पं. सदस्य नागेश चौगुले यांचा उपक्रम मण्णूर येथील मराठी शाळेतील खेळाडूंना जर्सीचे वाटप करतांना ग्रामपंचायत सदस्य नागेश चौगुले. समवेत अध्यक्ष सिद्राय होनगेकर, विजय मंडोळकर, किरण चौगुले, संदीप कदम, महेश बाळेकुंद्री आदी मान्यवर.
हिंडलगा/वार्ताहर
मण्णूर येथील सरकारी मराठी शाळा व कलमेश्वर हायस्कूलच्या खेळाडूंना ग्रामपंचायत सदस्य नागेश चौगुले यांच्याकडून स्पोर्ट्स जर्सीचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष सिद्राय होनगेकर होते.
विद्यार्थ्याना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला असल्याची माहिती नागेश चौगुले यांनी दिली.
यावेळी महेश बाळेकुंद्री, विजय मंडोळकर, संदीप कदम, रमेश सांबरेकर, महेश शिवणगेकर, किरण चौगुले, आकाश बाळेकुंद्री, शाळेचे मुख्याद्यापक एस. एस. नाईक, क्रीडा शिक्षक शिक्षक एल. एस. गौड़र सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
—————