बेळगाव :
मनुर गावच्या शालेय विद्यार्थ्यांना बसविना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, मनूर गावावरून ये जा करणाऱ्या बसेस थांबविल्या जात नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी म्हणून शालेय विद्यार्थ्यांसह हिंदवी स्वराज संघटनेचे प्रमुख व दलित संघटनाचे कार्यकर्ते मिळून कर्नाटक राज्य बेळगाव परिवहन कार्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान अशी मागणी करण्यात आली आहे मनूर गावाला अद्याप बसत नसल्यामुळे गावावरून ये जा करणाऱ्या बसीतूनच विद्यार्थी सह नागरिक बेळगावला येत असतात यासाठी मनुर गावासाठी खास बस सोडावी व विद्यार्थी नागरिकांचे बेहाल थांबवावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले, अनेक वेळा निवेदन देऊन तक्रार केली गेली असली तरी याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले, यावेळी एका विद्यार्थिनी बस न थांबवल्यामुळे काय वेदना व्यक्त करते ते पहा वाईट,, मनूर गावावरून आंबेवाडी, गोजगा, गावाच्या बसेस ये जा करत असतात, पण सकाळी व सायंकाळी पाचच्या दरम्यान या बसेस मनूर बस स्टॉप ला बस थांबवत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, जर येत्या काळात विद्यार्थ्यांना सोयीस्कर होण्यासाठी बसेस थांबवल्या नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी मनूर गावातील ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मी लक्ष्मण येळगुळकर व हिंदवी स्वराज संघटनेचे अध्यक्ष सह सदस्य व इतर नागरिक उपस्थित होते