Spread the love

बेळगाव:

बेळगाव दि.८- महाशिवरात्री निमित्त अध्यापक कुटुंबियांच्या प्राचीन शिव पंचायतन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी नामस्मरणात अनेक भक्त सहभागी झाले होते.नामस्मरण झाल्या नंतर रुद्राभिषेक करण्यात आला.यावेळी पूजेचे पौरोहित्य वे.शा.सं.नागेश देशपांडे यांनी केले होते.मंदिराचे ट्रस्टी प्रकाश अध्यापक यांनी रुद्राभिषेक केला.रुद्राभिषेक झाल्या नंतर नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली.यावर्षी उत्तम पाऊस पडावा,पिके चांगली यावीत,जगात सुरू असलेली युद्धे संपून सगळीकडे शांतता नांदावी आणि जगातील समस्त मानव जातीचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना करण्यात आली.यावेळी मंदिराचे ट्रस्टी आनंद अध्यापक,विलास अध्यापक,निरंजन अध्यापक,आदित्य अध्यापक , समाजसेवक सुधीर मोरे आणि भक्त उपस्थित होते.भक्तांनी दर्शनासाठी दिवसभर गर्दी केली होती.