Spread the love

बेळगाव :

श्री शनि जयंतीनिमित्त बेळगाव येथील शनि देवाचे दर्शन घेण्यासाठी बेळगाव सह विविध भागातील भक्ताने दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती , बेळगाव शहरातील पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरामध्ये आज गुरुवारी विविध धार्मिक विधी व कार्यक्रमांद्वारे श्री शनी जयंती मोठ्या भक्तीभावाने साजरी करण्यात आली.
श्री शनि जयंतीनिमित्त पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरामध्ये आज पहाटे सूर्योदयाला श्री शनि जन्मोत्सव आणि त्यानंतर पाळणा झाला. त्यानंतर श्री शनि देवांना रुद्राभिषेक, तैला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शनी शांती, शनी होम, तीळ होम वगैरे विविध धार्मिक विधी पार पडले.

यावेळी जगामध्ये शांतता, सुख -समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना व विशेष पूजा करण्यात आली. वेदशास्त्र संपन्न नागेश उर्फ बाळू देशपांडे यांनी सर्व धार्मिक विधींचे पौरोहित्य केले. याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त आनंद अध्यापक, प्रकाश अध्यापक, विलास अध्यापक व निरंजन अध्यापक उपस्थित होते. श्री शनि जयंतीनिमित्त पहाटेपासून पाटील गल्ली शनी मंदिरात देवदर्शन व पूजा -अभिषेक यासाठी भाविकांची भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे मंदिरा बाहेर भाविकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पहावयास मिळत आहेत. आज सकाळी शहरातील अनेक मान्यवरांनी श्री शनी मंदिराला भेट देऊन देवदर्शन व आशीर्वाद घेतले. सर्व भक्तांना सकाळपासून दिवसभर प्रसादाचे वाटप केले जात आहे.