Spread the love

नदीकाठी जुगार खेळत असताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यावेळी घाबरून बोटीतून पसार होताना बुडून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील कोल्हार तालुक्यातील जुने बळोतीनजीक कृष्णा काठावर घडली आहे. कोल्हार शहरातील रहिवासी महबूब वालीकार वय 30, तयब चौधरी वय 42, रफिक जालगार उर्फ बांदे वय 55, पुंडलिक मल्लाप्पा यंकंची वय 36, दशरथ गौडर सूळीभावी वय 66 असे मयत झालेल्या दुर्दैवी व्यक्तींची नावे आहेत. बोटीतील सचिन कटबर व बशीर होनवाड त्या दोघांना पोहता येत असल्याने पोहत नदीकाठावर सुरक्षितपणे पोचल्याने या दोघांचा जीव वाचला आहे.

त्याबद्दल अधिक माहिती अशी की सुमारे आठ जणांचा गट नदीकाठावर जुगार खेळत असल्याचे माहिती मिळाल्यानंतर कोल्हार पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांना पाहून घाबरलेल्या सहा जणांनी पोलिसांना चुकविण्यासाठी नदी काठावर असलेल्या पारंपरिक गोलाकार बोटीत बसून पळ काढला. नदीत काही अंतरावर गेल्यानंतर पाण्याच्या भोवऱ्यात अडकून बोट पाण्यात उलटली. पोहता येत नसल्याने सर्वजण पाण्यात बुडून मरण पावल्याचे दुर्दैवी घटना घडली. तर या बोटितील दोघेजण पोहता येत असल्याने बचावले आहेत.

साखर मंत्री व शिवानंद पाटील घटनास्थळी भेट देऊन म्हणाले सदर घटना दुर्दैवी असून सरकारकडून भरपाई मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल असे सांगितले.