बेळगाव :
नावघे क्रॉस येथील स्नेहम इंटरनॅशनल कारखान्याची पाहणी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली, आणि घटनेचा आढावा घेतला. कारखान्यात तयार होणाऱ्या सेलोटेप बदल माहिती घेताना पालकमंत्र्यांनी कारखान्यातून अशा आगीच्या घटना घडू नयेत याची दक्षता घेण्याचे आव्हान यावेळी केले. बुधवार सात रोजी रात्री झालेल्या पाहणी वेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त मार्टिन यांच्यासह जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे आदी उपस्थित होते