जी एस एस पी यु आणि डीग्री काॅलेजच्या वतीने अंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा
जी एस एस काॅलेजच्या पी यू सी ,बी एस सी,एम एस सी,बी सी ए शाखेच्या प्राध्यापिका आणि कार्यालयीन शाखेच्या महिला कर्मचारी वर्गाने महिला दिनाचे आयोजन केले, या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यां डाॅ अंकिता खरीत विख्यात फिजीयोथेरपीस्ट व फिटनेस तज्ञ ह्या उपस्थित होत्या, डाॅ अंकिता यांनी उपस्थित सर्व महिला कर्मचारी वर्गास आपलं आरोग्य कसे जपावे बाह्य आरोग्या बरोबर अंतरीक आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे, ती कशी घ्यावी या बद्दल सविस्तर माहिती दिली.
एस के ई सोसाइटी च्या जी एस एस काॅलेजच्या वतीने आयोजित अंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सोसायटीच्या प्राध्यापिका, संचालक मंडळातील महिला,परिसर व्यवस्थापनच्या महिला कर्मचारी, अशा सर्व महिलानी संघटीत येऊन हा दिवस साजरा केला आणि एस के ई सोसाइटीच्या कार्यप्रणालीची संघटीत छबी समाजासमोर प्रस्तुत केली.
