Spread the love

*स्केटर्स सौरभ आणि अनघा यांना बाल प्रतिभा पुरस्काराने सन्मानित*

बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स सौरभ साळोखे व अनघा जोशी यांना स्केटिंग मधील उत्कृष्ट कामगिरी केलेबद्दल जिल्हा बाल प्रतिभा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा सत्कार बेळगाव येथील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम शाल व बुके देऊन करण्यात आला हा पुरस्कार जिल्हा बाल कल्याण व महिला सबलीकरण यांच्या वतीने नुकताच देण्यात आला वरील दोन्ही स्केटर्स ना प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गंगणे , सोहम हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.या सत्कार बद्दल दोघांनी ही जिल्हा प्रशासन विभागाचे आभार मानले आहेत…