बेळगावातील हिंदू संमेलनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचा इतिहास जिवंत
बेळगाव : संयुक्त महाराष्ट्र चौक, खडेबाजार येथे आयोजित हिंदू संमेलनात मंगळवारी मुख्य वक्ते डॉ. शिवरत्न शेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचा प्रेरणादायी इतिहास उलगडला. रायगडावरून दक्षिण दिग्विजयासाठी प्रस्थान करून महाराज भागानगर (आताचे हैदराबाद) येथे दाखल झाले, त्या ऐतिहासिक प्रसंगाचे प्रभावी वर्णन त्यांनी केले.
कुतुबशहा महाराजांना भेटण्यासाठी स्वतः येत असल्याचे समजताच, “आपण काका समान आहात, आपण आपल्याकडे येऊ,” असे म्हणत छत्रपतींनी दाखवलेली नम्रता आणि राजनैतिक दूरदृष्टी यावर डॉ. शेटे यांनी विशेष भाष्य केले. भागानगर महाराजांच्या स्वागतासाठी भव्यदिव्य सज्ज झाले होते. गॅलरीतून जनसमुदाय उत्सुकतेने हा ऐतिहासिक सोहळा पाहत उभा होता. ठिकठिकाणी रांगोळ्या, फुलांची सजावट आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुमारे ५० हजारांची भव्य फौज — त्यात २० हजार घोडदळ व ३० हजार पायदळ — अशा मराठा सैन्याच्या दिमाखदार आगमनाची कल्पनाच रोमांचकारी आहे, असे सांगत डॉ. शेटे यांनी उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. मराठ्यांच्या शौर्य, शिस्त आणि संघटनशक्तीचे हे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या ऐतिहासिक कथनाने उपस्थित श्रोत्यांमध्ये अभिमानाची भावना जागृत झाली असून, कार्यक्रमाला मोठी उपस्थिती लाभली.

बेळगाव हिंदू संमेलनात शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयाचा जाज्वल्य इतिहास उजागर
Related Posts
नागेनटी गावातील यल्लमा भक्तांचा टँकर प्रकरणावरून संताप
Spread the loveनंदीहळी ग्रामपंचायत व्याप्तीतील नागेनटी गावातील श्री यल्लमा देवी भक्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सौंदत्ती येथील यल्लमा डोंगरावर गेले होते. डोंगरावर पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायत उपाध्यक्ष, सदस्य आणि…
सीमाप्रश्न सोडवण्यासाठी ‘लाखो सह्यांच्या मोहिमेला’ येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचा पाठिंबा
Spread the love सीमाप्रश्न सोडवण्यासाठी ‘लाखो सह्यांच्या मोहिमेला’ येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचा पाठिंबा येळ्ळूर: बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सीमाप्रश्न निकाली काढण्यासाठी आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हाती…
