Spread the love

माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या जन्मदिनानिमित्त श्री गणेश मंदिरात अभिवादन; विकासदृष्टीचा जागर

बेळगाव : माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा साधी, विनम्र आणि जनतेशी नाळ जोडून काम करणारे लोकप्रिय नेते कै. सुरेश अंगडी यांच्या जयंतीनिमित्त बेळगावातील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथील श्री गणेश मंदिरात विशेष प्रार्थना व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कै. सुरेश अंगडी यांच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण करताना, कर्नाटकाच्या विकासासाठी तसेच बेळगावसह उत्तर कर्नाटकातील विविध विकासकामांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाला उजाळा दिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले असून जनतेच्या मनात त्यांनी कायमचे स्थान निर्माण केले असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला माजी खासदार मंगला अंगडी, खासदार जगदीश शेट्टर, राजन जाधव, अनूप काटे, इरय्या खोत, हनमंत कागलकर, चेतना अंगडी, संजय भंडारी, राहुल मुचंडी, विजय भद्र, नागराज पाटील, मुक्तार पठाण, सविता कार्डी, ॲड. महावीर, राज पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रार्थना व पुष्पांजली अर्पण करून उपस्थितांनी कै. सुरेश अंगडी यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.