Spread the love

एबीजी इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्सतर्फे उत्साहात शिवजयंती; 188 व 88 वेळा रक्तदान करणाऱ्यांचा विशेष सन्मान
बेळगाव: उद्यमबाग येथील एबीजी इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स या आस्थापनात दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. किशोर अचमनी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन तर विनायक धाकलूचे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले.
यावेळी सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रक्तदात्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तब्बल 188 वेळा रक्तदान करणारे विनायक धाकलूचे आणि 88 वेळा रक्तदान करणारे किशोर अचमनी यांचा आस्थापनाचे प्रमुख आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाला रोहित गुरव, अर्जुन कुसुमळकर, हनुमंत पाटील, केदार जाधव, चंद्रशेखर जोग, वैभव जाधव, कपिल कामानाचे, राजू राजकोवी, हरीश बेळवी, तुषार जाधव, समर्थ जाधव, सविता पाटील, अनुपमा पाटील, माया देसाई व दीपा पानोरे आदी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.