बेळगाव : क्रीडाभारती अखिल भारतीय नियामक मंडळाच्या बैठकीसाठी बेळगावात आगमन झालेल्या मान्यवरांचे बेळगाव रेल्वे स्थानकावर क्रीडा भारती बेळगाव अध्यक्ष किरण जाधव यांनी उत्साहात स्वागत केले. पुष्पगुच्छ देऊन आणि हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून मान्यवरांचे स्वागत केले.
शुक्रवारपासून मंडोळी रोड येथील साईराज लॉनच्या सभागृहात या महत्त्वपूर्ण बैठकीला प्रारंभ होत आहे. देशभरातील ५० हून अधिक महनीय व्यक्ती या बैठकीस उपस्थित राहणार असून क्रीडाभारती अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी आणि क्रीडा भारती संघटन मंत्री प्रसाद महानकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
2036 साली भारतात होणाऱ्या संभाव्य ऑलिंपिक स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडू आणि युवकांना सक्षम करण्यासाठी आवश्यक नियोजन, प्रशिक्षण व पायाभूत सुविधांवर या बैठकीत सखोल चर्चा होणार आहे. क्रीडाक्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासासाठी बेळगावात आयोजित ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

2036 ऑलिंपिकच्या पार्श्वभूमीवर बेळगावात मंथन; किरण जाधव यांनी रेल्वे स्थानकावर केले स्वागत
Related Posts
58 वर्षांनंतर हदिगनूरमध्ये महालक्ष्मी यात्रेचा भव्य सोहळा 14 ते 22 एप्रिलदरम्यान यात्रा; तयारी अंतिम टप्प्यात
Spread the love हदिगनूर परिसरात तब्बल 58 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर महालक्ष्मी यात्रेचा मंगलमय सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. म्हाळेनट्टी, बोडकेनट्टी, होसोळी, कट्टनभाबी, कुरिहाळ केएच व कुरिहाळ बीके या सात गावांच्या…
हनुमान जयंती निमित्त चन्नेवाडी येथे विविध कार्यक्रम*
Spread the love*हनुमान जयंती निमित्त चन्नेवाडी येथे विविध कार्यक्रम* चन्नेवाडी ता.खानापूर येथे गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सूर्योदयाला जयंती, त्या नंतर…
