बेळगाव एपीएमसीत भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण; मागणीअभावी माल फेकण्याची वेळ

बेळगाव : एपीएमसी घाऊक बाजारात भाजीपाल्याच्या दरात झालेल्या तीव्र घसरणीमुळे शेतकरी आणि व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. मागणी कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला न विकला जाता थेट कचऱ्यात टाकण्याची वेळ आली आहे.
एपीएमसी यार्डमध्ये सध्या मुळा, टोमॅटो, गाजर, कोबी, फ्लावर आणि घेवड्याच्या शेंगांचे ढीग साचलेले दिसत आहेत. अखेरीस हा माल महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून उचलून कचरा डेपोत टाकला जात आहे. या परिस्थितीमुळे बाजारावर आलेल्या संकटाची तीव्रता स्पष्ट होत आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, मध्य-पूर्वेकडील तणाव आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल्स व रेस्टॉरंट्स बंद पडल्याने भाजीपाल्याच्या मागणीत अचानक मोठी घट झाली आहे. तसेच गोव्याला जाणाऱ्या शेतमालाच्या खपावरही परिणाम झाला असून तेथील हॉटेल्स बंद असल्याने बाजारात खरेदीदारांची संख्या कमी झाली आहे.
दरम्यान, भाजीपाल्याचे दर ऐतिहासिक तळाला पोहोचले आहेत. गाजराचा दर 50-60 रुपयांवरून 10-12 रुपये प्रति किलो, टोमॅटो 30-40 रुपयांवरून 6-10 रुपये, हिरवी मिरची 70-80 रुपयांवरून 35-40 रुपये, तर कोथिंबीर 10-20 रुपयांवरून 3-4 रुपयांपर्यंत घसरली आहे. कांदा आणि बटाट्याचे दरही निम्म्याहून अधिक कमी झाले आहेत.
“वाहतुकीचा खर्चही निघत नाही. बियाणे, खते आणि मजुरीचा खर्च करूनही काहीच मिळत नाही,” अशी व्यथा कडोली येथील शेतकरी सूरज कटांबळे यांनी व्यक्त केली.
दर घसरल्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना काही दिवस काढणी थांबवण्याचा सल्ला दिला जात आहे. “आता माल आणल्यास अधिक नुकसान होईल,” असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
एकूणच, मागणी लवकर वाढली नाही तर बेळगावमधील भाजीपाला उत्पादकांसाठी हा हंगाम अत्यंत कठीण ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बेळगाव एपीएमसीत भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण; मागणीअभावी माल फेकण्याची वेळ
Related Posts
हनुमान जयंती निमित्त चन्नेवाडी येथे विविध कार्यक्रम*
Spread the love*हनुमान जयंती निमित्त चन्नेवाडी येथे विविध कार्यक्रम* चन्नेवाडी ता.खानापूर येथे गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सूर्योदयाला जयंती, त्या नंतर…
सायबर स्कॅमर्सपासून सावध राहून आर्थिक नुकसान टाळा; पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन
Spread the loveसायबर स्कॅमर्सपासून सावध राहून आर्थिक नुकसान टाळा; पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन बेळगाव: “आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहणे हा आपल्या सजगतेचा भाग आहे. कोणत्याही आमिषाला…
