बेळगाव : शहरातील फोर्ट रोड परिसरात सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. संबंधित व्यक्ती अंदाजे ५० वर्षे वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
फोर्ट रोड येथे एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला पडल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर यांना फोनद्वारे मिळाली. त्यानंतर अवधूत तुडवेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता संबंधित व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आला.
यानंतर लगेचच मार्केट पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत जिल्हा सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास मार्केट पोलीस करत आहेत.
दरम्यान, या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, निलेश हिरेहोल्ली, शशिकांत अंबेवाडेकर, मायकेल पिंटो आणि राजू टककेर यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती देत मृत व्यक्तीला सिव्हिल रुग्णालयात नेण्यास मदत केली.


फोर्ट रोडवर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; सोमवारी मध्यरात्री घटना उघड
Related Posts
स्केटर्स सौरभ आणि अनघा यांना बाल प्रतिभा पुरस्काराने सन्मानित*
Spread the love*स्केटर्स सौरभ आणि अनघा यांना बाल प्रतिभा पुरस्काराने सन्मानित* बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स सौरभ साळोखे व अनघा जोशी यांना स्केटिंग मधील उत्कृष्ट कामगिरी केलेबद्दल जिल्हा…
रयत गल्लीतील महिलांचा घागर मोर्चा; पंधरा दिवसांपासून पाणी टंचाई
Spread the loveबेळगाव : वडगाव येथील रयत गल्ली परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने संतप्त महिला व नागरिकांनी मंगळवारी थेट घागरी डोक्यावर घेऊन बेळगाव महानगरपालिकेवर मोर्चा…
