बेळगाव : जुने बेळगाव येथील प्रसिद्ध श्री कलमेश्वर मंदिराची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक इंगळ्या कार्यक्रमाला हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.
यात्रेदरम्यान मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. श्री कलमेश्वर ट्रस्ट कमिटीच्या वतीने यात्रेचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले होते. भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या होत्या.
या यात्रेदरम्यान अनेक भाविकांनी मंदिराच्या विकासासाठी लाखो रुपयांची देणगी देऊन आपली श्रद्धा

व्यक्त केली. मंदिर परिसरात सर्व कार्यक्रम शांततेत आणि सुरळीत पार पडावेत यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
एकूणच, जुनी बेळगाव येथील श्री कलमेश्वर यात्रा आणि इंगळ्या कार्यक्रम भक्तांच्या मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात संपन्न झाला.
जुने बेळगाव येथे श्री कलमेश्वर यात्रेला भक्तांची उसळली गर्दी; इंगळ्या कार्यक्रम उत्साहात संपन्न
Related Posts
बेळगावात प्रथमच रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया; सुरण्णावर हॉस्पिटलची ऐतिहासिक कामगिरी
Spread the loveबेळगाव : येथील सुरण्णावर हॉस्पिटल, वेळगाव यांनी वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश संपादन करत बेळगावमध्ये प्रथमच रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीपणे सुरू केली आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया अधिक…
कर्नाटक राज्य वकील परिषदेच्या निवडणुकीत मोठी चुरस; १४९ उमेदवार रिंगणात
Spread the loveबेळगाव : कर्नाटक राज्य वकील परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राज्यभरात मोठी चुरस निर्माण झाली असून मतदान प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या निवडणुकीत राज्यभरातून एकूण १४९ उमेदवार रिंगणात उतरले…
