*प्यास फाऊंडेशन टीम चा सत्कार*
प्यास फाऊंडेशन बेळगांव ही पाण्यासाठी काम करणारी एक संस्था आहे हया संस्थे मार्फत आतापर्यंत लहान मोठे 13 तलाव व 4 विहिरी पुनर्जीवित करून लोकांच्या कल्याणासाठी उपयोगी करून देण्यात आले आहेत त्याचेच एक उदाहरण म्हणून टीचर्स कॉलनी दत्त मंदिर येथील 150 वर्षे जुनी संपूर्ण पडलेली विहीर पुनरजीवित करून भक्कमपने उभी करून दिली त्याबद्दल टीचर्स कॉलनी येथील दत्त मंदिर सेवा समिती तर्फे प्यास फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ माधव प्रभू, सेक्रेटरी डॉ प्रिती कोरे, खजिनदार लक्ष्मीकांत पसारी, सभासद रोहन कुलकर्णी, सूर्यकांत हिंडलगेकर यांचा शाल, फुले व प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी श्री माधव प्रभू यांनी पाण्याचे महत्त्व पटवून सांगितले तर डॉ प्रिती कोरे यांनी ए के पी फेरोकास्ट चे पराग भंडारे व प्रीती भंडारे यानी विहिरी साठी सहकार्य केलेबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले त्यानंतर प्यास टीम च्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी दत्त मंदिर सेवा समिती चे के सी मोदी, वाय एम सुळेभावी, एस एच मधलूर, वी आर गुडी,एस एन तावरे, श्रीकृष्णा सराफ,सागर सुळेभावी, माधव देशपांडे, विनोद मात्तिकोप, श्रीनिवास भस्मे, गिरीश महाजन इतर मान्यवर व कॉलनी तील महिला व पुरुष व इतर रहिवाशी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
