Spread the love

भून्याय मंडळ सदस्यपदी चौघांची नियुक्ती

बेळगाव प्रति: भून्याय मंडळावर शासननियुक्त

सदस्य म्हणून चौघांची नेमणूक केली जाते. त्यानुसार मंगळवारी निपाणी तालुका भून्याय मंडळावर चौघांची सदस्य म्हणून नियुक्त झाली आहे. यामध्ये वैभव पाटील (कोडणी), प्रदीप पाटील (नांगनूर), अब्बास फरास (निपाणी) आणि योगेश दाभाडे (कोगनोळी) यांची नियुक्ती झाली आहे. महसूल खात्याने याबाबत आदेश काढल्यानंतर तहसीलदार एम. एन. बळीगार यांनी सदस्य निवडीचा

अधिकृत आदेश दिला. राज्यामध्ये काँग्रेस सरकार सत्तेत आल्यापासून विविध शासकीय कमिट्यांवर नियुक्त केल्या जात आहेत. सदर निवडीसाठी पालकमंत्री मंत्री सतीश जारकीहोळी, महसूल मंत्री कृष्ण व्यायरेगौडा यांच्याकडे माजी आ. काकासाहेब पाटील, माजी आ. वीरकुमार पाटील, बुडा आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील आदींनी शिफारस केली होती.