हंदीगनूर महालक्ष्मी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळा उत्साहात


बेळगाव दि. ११:हंदीगनूर येथे श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळ्याचा कार्यक्रम मंगळवार (दि. १० मार्च ) सकाळी उत्साहात पार पडला. जवळपास ५८ वर्षांनंतर हांदीगनूर तसेच परिसरातील म्हाळेनट्टी, बोडकेनहट्टी, होसोळी, कट्टनभावी, कुरिहाळ खुर्द आणि कुरिहाळ बुद्रुक या सहभागी गावांच्या संयुक्त विद्यमाने श्री महालक्ष्मी देवीची यात्रा येत्या १४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर यात्रोत्सव मंडपाच्या उभारणीसाठी मुहूर्तमेढ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे सहायक मलगौडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. मुहूर्तमेढ सोहळ्यानंतर गावातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने कलश पूजन केले. त्यानंतर मनीकेरी गावातून श्री महालक्ष्मी देवीच्या रथासाठी लागणारे साहित्य आणण्यात आले. गावातील विविध देवी-देवतांची विधीपूर्वक पूजा करून भंडाऱ्याची उधळण करण्यात आली.
भक्तिमय वातावरणात ढोल-ताशांच्या गजरात आणि मिरवणुकीच्या स्वरूपात हे साहित्य मनीकेरी येथून हांदीगनूर गावात आणण्यात आले. या वेळी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमास यात्रा समितीचे अध्यक्ष गंगाधर पाटील, कलाप्पा कडोलकर, भैरवनाथ पाटील, दयानंद पाटील, मारुती पाटील, पुंडलिक पाटील, महेश पाटील, आनंद पाटील, किरण पाटील, बाबू तळवार, विजय कांबळे आदींसह सहभागी गावांतील ग्रामस्थ, महिला वर्ग, तरुण मित्रमंडळे, महालक्ष्मी यात्रा समितीचे सदस्य तसेच बाळगोपाळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात्रोत्सवाच्या तयारीला आता वेग आला असून १४ एप्रिल रोजी होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेसाठी परिसरातील भाविकांमध्ये मोठा उत्स�
हंदीगनूर महालक्ष्मी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळा उत्साहात
Related Posts
दोडवाडा खून प्रकरणाचा पर्दाफाश; तीन आरोपी जेरबंद
Spread the loveबेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील दोडवाडा गावाजवळ आढळलेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा उलगडा करत दोडवाडा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांना…
श्री मंगाई देवी यात्रा उत्सव २०२६ ची जय्यत तयारी, १० जुलैला देवीचे गाऱ्हाणे, ११ ऑगस्टला मुख्य यात्रा उत्सव;
Spread the loveबेळगाव : परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या श्री मंगाई देवीचा वार्षिक यात्रा उत्सव २०२६ यंदाही मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…
