Spread the love

बेळगाव : परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या श्री मंगाई देवीचा वार्षिक यात्रा उत्सव २०२६ यंदाही मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यात्रेच्या पूर्वसंध्येला शुक्रवार, १० जुलै २०२६ रोजी रात्री ८ वाजता देवीला गाऱ्हाणे घालण्याचा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पवित्र विधीस सर्व भाविकांनी उपस्थित राहून देवीचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यानंतर मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्य यात्रा उत्सव संपन्न होणार आहे. या दिवशी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून देवीचे दर्शन घेणार असल्याची अपेक्षा आहे.
तमाम ग्रामस्थ आणि श्री मंगाई देवी यात्रा कमिटी यांच्या वतीने सर्व भक्तांना यात्रा उत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.