माळमारुती पोलिसांकडून 30 लाखांचा अवैध दारू साठा जप्त

:बेळगावच्या माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर व त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज शनिवारी सकाळी सुमारे 30 लाख रुपये किमतीचा 800 बॉक्स बेकायदा दारूचा साठा जप्त केला असल्याची माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिली.
बेळगाव पोलिस आयुक्तालयामध्ये आज शनिवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पोलीस आयुक्त बोरसे यांनी सांगितले की, कर्नाटकात उत्पादित न झालेल्या अवैध दारूच्या मोठ्या साठ्याची कोणतेही कागदपत्र नसताना बेकायदा वाहतूक होत असल्याची खात्रीलायक माहिती आज सकाळी माळमारुती पोलिसांना मिळाली.
