Spread the love

बेळगावची लेक श्रुती श्रीकांत पाटील, नुकतीच पीएसआय परीक्षेत उत्तीर्ण झालेली ही तरुणी, अजून अधिकृत प्रशिक्षण सुरू करण्याआधीच आपल्या कर्तव्यनिष्ठेची झलक दाखवून गेली. मुंबईहून बेळगावला परतताना रेल्वे स्टेशनच्या लिफ्टमधून उतरतेवेळी अचानक एका वयोवृद्ध महिलेचा पाय घसरला व ती लिफ्टमध्येच कोसळली. क्षणाचाही विलंब न करता, श्रुतीने तत्परतेने त्या महिलेचा हात धरून तिला मोठ्या दुर्घटनेतून सुरक्षित बाहेर काढले.
हा प्रसंग पाहणाऱ्या सर्वांच्या नजरा तिच्या धैर्याने भारावून गेल्या. अजून पोलीस प्रशिक्षण सुरू व्हायचं आहे, तरी आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांतून आलेली ही संवेदनशीलता आणि कर्तव्यभावना क्षणभरात उमटली. खऱ्या अर्थाने पोलीस अधिकारी कसा असावा /याचे पहिले पाऊल श्रुतीने घालून दिले, हे दृश्य कॅमेऱ्यात टिपले गेले आणि अनेकांच्या मनाला स्पर्शून गेले.