- माणिकवाडी हॉटेलमधील वेेंकप्पा खून प्रकरणात पोलिस तपासावर ग्रामस्थांचा रोष; न्यायासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदन.
खानापूर तालुक्यातील माणिकवाडी येथील हॉटेलमध्ये चोरी केल्याचा आरोप लावून झालेल्या वेेंकप्पाच्या खून प्रकरणात पोलिसांकडून तपास जाणीवपूर्वक विलंबित केला जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी जोरदार निदर्शने केली. निदर्शनानंतर त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर केले.
१६ ऑगस्ट रोजी खानापूरमधील एका हॉटेलमध्ये चोरी केल्याच्या संशयावरून हॉटेल मालक आणि त्याच्या भावाने वेेंकप्पाला खोलीत कोंडून बेदम मारहाण केली होती. या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला.
गावकऱ्यांचा आरोप आहे की, वेेंकप्पा हॉटेलमध्ये प्रामाणिकपणे काम करत होता. त्याच्यावर खोटा आरोप ठेवून त्याला मारहाण करून खून करण्यात आला. मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या त्याच्या कुटुंबाचा तोच आधार होता. आता त्याच्या आई-वडिलांना हॉटेल मालकांकडून धमक्या मिळत असून, “या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
