Spread the love

*पंडित नेहरू हायस्कूलच्या 3 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड*..
सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत विश्वभारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू हायस्कूल शहापूर बेळगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी 3 सुवर्णपदक व 1 कास्यपदक मिळवलेले आहे.
14 वर्षाखालील
1) *कु. राजू दोडमनी* यांने 48 किलो वजन गटात प्रथम क्रमांक तसेच 17 वर्षाखालील
2) *कु. विनय मुतनाळ* यांने 71 किलो वजन गटात गिरको रोमण यामध्ये प्रथम क्रमांक ,
3) *कु.सुरेश लंगोटी* 92 किलो वजन गटात प्रथम क्रमांक
4) *कैलास आर टी* 65 किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळवलेला आहे .
या विद्यार्थ्यांना विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री विजयराव नंदिहळी तसेच शाळेचे मुख्याध्यापक मारुती मुगळी, क्रीडाशिक्षक निरंजन कर्लेकर व विज्ञान शिक्षक विनायक कंग्राळकर तसेच शाळेचे सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे आता या विद्यार्थ्यांची निवड दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी झालेली आहे…