Spread the love

बेळगाव येथील Skyworld Aviation Academy मध्ये आज दुपारी 12 वाजता विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्नल किर्पाल सिंह (Managing Director – Aspiring Leaders Training Institute India), हे प्रख्यात सैन्य अधिकारी व Personality Development Expert यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना नेतृत्व, शिस्त आणि करिअरविषयी प्रेरणादायी संदेश मिळाले.

समारंभात CEO विनोद एस. बामणे आणि Managing Director ज्योती विनोद बामणे यांची उपस्थिती लाभली.

अकॅडमीतील तीन गुणी विद्यार्थिनी —
दिव्या गावळकर (केरवड दांडेली)
शिफा मुल्ला (हुक्केरी)
मिनाझ शेख (दांडेली)
— यांची मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी निवड झाल्याचा अभिमानाचा क्षण कर्नल सिंह यांच्या हस्ते सत्कार करून साजरा करण्यात आला.

पालकांचा सुद्धा विशेष गौरव करण्यात आला. संस्थेच्या नेतृत्वाबद्दल बामणे दांपत्याचे आभार मानण्यात आले. कार्यक्रम आनंद, प्रेरणा आणि यशाने उजळून निघाला.