बेळगाव/खानापूर : उद्यमबाग येथील कलाश्री बंब अॅण्ड स्टील फर्निचरच्या चौथ्या भाग्यवान योजनेचा अंतिम ड्रॉ भव्य उत्साहात पार पडला. या ड्रॉमध्ये दोड्ड होसुरचे प्रकाश जी. पाटील हे मुख्य विजेते ठरून चारचाकी कार या आकर्षक बंपर बक्षिसाचे मानकरी झाले.
या विशेष कार्यक्रमाचे औचित्य साधून कलाश्री उद्योग समूहाच्या 30 व्या वर्धापन दिनानिमित्त पाचवी भाग्यवान योजना जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोळेकर होते.
कार्यक्रमाची सुरुवात खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक अरविंद पाटील, गोव्याचे उद्योजक हनमंत नाईक व कृष्णा नाईक, कर्नाटकचे माजी साखर मंत्री शशिकांत नाईक, जिव्हाळा सेवाश्रम सिंधुदुर्गचे सुरेश बिर्जे, वरिष्ठ वकिल अॅड. शिल्पा गोडीगौडर, श्री क्षेत्र जोतीबा ट्रस्टचे दत्तात्रय शिंदे आणि उद्योजक-सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
संचालिका सुकन्या डोळेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सर्व पाहुण्यांचा शाल, बुके व भेटवस्तूंनी सन्मान करण्यात आला.
मान्यवरांनी आपल्या मनोगतात कलाश्री उद्योग समूहाची गेल्या 30 वर्षांची विश्वासार्ह वाटचाल, विस्तार आणि ग्राहकांचा वाढता विश्वास याची प्रशंसा केली. तसेच नव्याने जाहीर झालेल्या 5व्या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
यानंतर 30 वर्षे पूर्ण केल्याबद्दल कर्मचारी व डीलर्सचा सत्कार करण्यात आला.
मुख्य ड्रॉमध्ये प्रकाश पाटील हे कारचे मानकरी ठरले, तर अन्य विजेते पुढीलप्रमाणे—
🔹 ज्ञानेश्वरी कोहली (वडगाव) – ₹30,000 व्हाऊचर
🔹 नंदिनी चौगुले (धामणे) – ₹25,000 व्हाऊचर
🔹 पानेश्वरी पुजारी (पिरनवाडी) – ₹21,000 व्हाऊचर
🔹 ज्योती डी. पाटील (भवानीनगर) – ₹15,000 व्हाऊचर
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डीलर विजेते—
🔹 राजेंद्र कुबडे (सावंतवाडी) – ₹5,000
🔹 अशोक गोजेकर (जानेवाडी) – ₹3,000
🔹 राहुल जांबोटकर (शिनोली) – ₹2,000
नव्याने जाहीर झालेल्या 5व्या भाग्यवान योजनेत तब्बल 21 बक्षिसांचा समावेश असून ट्रॅक्टर, कार, बैलजोडी, आयफोन, चांदी, दुचाकी, सोने, गाय, व विविध वस्तू तसेच एक लाख रुपयांपर्यंतच्या रोख बक्षिसांचा समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या योजनेत प्रति महिना केवळ ₹500 किंवा कलाश्री सोसायटीत ₹15,000 एफडी करून सहभागी होता येईल.
या कार्यक्रमाला बेळगाव, खानापूर, चंदगड, सावंतवाडी, गोवा, चिकोडी, बैलहोंगल परिसरातील हजारो सभासद, डीलर्स, हितचिंतक व नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

