*बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन साहेब यांची किल्ले राजहंगडाला भेट
.*
छत्रपती श्री शिवाजी महाराजांची पुण्यभूमी समजल्या जाणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील राजहंसगड किल्ल्यावर आज शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी बेळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी *मोहम्मद रोशन* यांनी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव जिल्ह्याची जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्या पासून आज पहिल्यांदाच जिल्हाधिकाऱ्यांनी राजहंसगड किल्ल्यावर भेट देत असल्याने सर्वप्रथम राजहंसगडातील युवकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचे राजहंसगड किल्ल्यावर स्वागत करण्यात आले, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम किल्ल्यावरील श्री सिद्धेश्वर मंदिरात प्रवेश करून देवाचे दर्शन घेतले व किल्ल्यावरील जगातील सर्वात मोठ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन संपूर्ण किल्ला परिसराची पाहणी केली. किल्ला परिसरात उद्भवणाऱ्या अनेक समस्या राजहंसगडातील युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने त्या सर्व समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याची ग्वाही राजहंसगडातील युवकांना बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
या समई राजहंसगड गावातील श्री भाऊराव पवार, जोतिबा थोरवत, पिंटू कुंडेकर, गौतम थोरवत, मोनेश्री थोरवत, सह ग्राम लेखाधिकारी मासेकर साहेब व ग्राम लेखाधिकारी सहाय्यक यादव मॅडम उपस्थित होत्या…..
