Spread the love

जी एस एस पी यु काॅलेजच्या गणित विभागाच्या सांख्यिकी संघाद्वारे स्पर्धेचे आयोजन

सालाबादप्रमाणे या वर्षी ही सांख्यिकी संघाद्वारे विज्ञान शाखेच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यासाठी गणित विषयाशी निगडीत निबंध लेखन स्पर्धा, गणित विषयातील प्रतिकृती बनविणे, विविध प्रतिकृतीच्या(सममीती सेमेट्रीकल ) रांगोळी स्पर्धा,पन्नास विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले.

आशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन सांख्यिकी संघाद्वारे करण्याचा मूळ उद्देश विद्यार्थी वर्गामध्ये गणित विषयातील न्यूनगंड, गैरसमज,गणित हा विषय कठीण, आशा विचारातून बाहेर आणणे आणि गणित विषयाबद्दल रुची निर्माण करणे, त्याच्यातील कल्पकता व वैचारिक क्षमतेला चालना देण्याचे कार्य होत आहे.
25 नोव्हेंबर हा गणित दिवस साजरा केला जातो या अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही आयोजन करण्यात आले
या कार्यक्रमास प्राचार्य एस एन देसाई ,उपप्राचार्य सचिन पवार,टी.एल.सी.चे अध्यक्ष प्रा प्रवीण पाटील, गणित विभाग प्रमुख प्रा सविता कुलकर्णी, प्रा. संजय ज्योती,प्रा रविशंकर आनंदाचे,सांख्यिकी संघाच्या अध्यक्षा प्रा डा ममता कुट्टे,प्रा वेदश्री देशपांडे, प्रा मनीषा बाळेकुंद्री, प्रा भाग्यश्री कांबळे, प्रा नागनाथ जोशी उपस्थित होते.
स्पर्धेत विजयी स्पर्धकाना मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले.